जळगाव शहरातून सुरक्षा रक्षकाची दुचाकी लंपास


जळगाव : जळगाव शहरातील जुने जळगाव भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळून चोरट्यांनी मोटारसायकल लंपास केली. शनिपेठ पोलिसांत या प्रकरणी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
हे खाजगी सुरक्षा रक्षक हेमकांत उत्तम बाविस्कर (48, जळगाव) यांनी दुचाकी (एम.एच.19 ए.एफ.8210) सोमवार, 27 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हे शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात असलेल्या स्वच्छतागृहाजव लावली व ते कामावर गेले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर आल्यानंतर त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. हेमकांत बाविस्कर यांनी शलिपेठ पोलीसात धाव घेवून दुचाकी चोरी झाल्याबद्दल तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक अमित बाविस्कर करीत आहे.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !