विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता
जळगाव : शहरातील लक्ष्मी नगरातील 35 वर्षीय विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता झाल्या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून विवाहितेचा शोध
जितेंद्र शिवाजी सगरे (40, रा.लक्ष्मी नगर, जळगाव) हे पत्नी कविता जितेंद्र सगरे (35), मुलगी जयश्री (9) आणि मुलगा रोहित (12) यांच्यासह वास्तव्याला आहे. जितेंद्र सगरे हे मिस्त्रीकाम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, 20 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता जितेंद्र सगरे यांची पत्नी कविता ह्या कुणालाही काहीही न सांगता मुलगी जयश्री आणि मुलगा रोहित यांच्यासह बेपत्ता झाल्या आहे. जितेंद्र सगरे यांनी पत्नी व दोन्ही मुलांचा नातेवाईक व ओळखीच्या नागरीकांकडे शोधाशोध केली परंतू कुठेही त्या आढळून आल्या नाही. विवाहितेला हिंदी, पावरी व अहिराणी भाषा बोलता येते. सोमवार, 27 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता जितेंद्र सगरे यांच्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली करण्यात आली. अधिक तपास पोलिस नाईक सिकंदर तडवी करीत आहेत.




