सावदा पालिका प्रशासकपदी कैलास कडलग
सावदा : सावदा पालिकेची पंचवार्षिक बुधवार, 29 डिसेंबर रोजी संपत असल्याने शासनाने पालिकेवर प्रशासक म्हणून प्रांताधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती केली आहे. गुरुवार, 30 डिसेंबर रोजी ते प्रशासक म्हणून पदभार घेतील. दरम्यान, फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांची यावल, फैजपूर, सावदा व रावेर या चारही पालिकावर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


