कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक : दहा गायींची सुटका ; चार संशयीतांना अटक


शिरपूर : परराज्यातून महाराष्ट्रात कत्तलीच्या उद्देशाने गायींची वाहतूक करणार्‍या वाहनावर राज्य सीमेवर बिजासन पोलिसांनी धडक कारवाई करीत चार संशयीतांना अटक केली. यावेळी दहा गायींची सुटका करण्यात आली. ही कारवाई बिजासन पोलीस चौकीवरील पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरून सोमवारी पहाटे करण्यात आली.

गुरांची अवैध वाहतूक ऐरणीवर
महाराष्ट्राच्या दिशेने गंगानगर येथून कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्य सीमेवरील बिजासन पोलिसांना मिळल्यावरून बिजासन पोलीस चौकीसमोर सापळा रचण्यात आला. दरम्यान पहाटे संशयित अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (पीबी.03 बी.ए.7936) येताची त्याची तपासणी करून गुरांची निदर्यतेने होणारी वाहतूक रोखण्यात आली. गायींची बिजासन मंदिर गोशाळेत रवागनी करण्यात आली.

चौघांना अटक
ट्रक चालक सुरजाराम मुन्शीराम गरू (35, रा.चुनगढ, राजस्थान), सहचालक दीपक बनवारीलाल कुमावत (रा.गंगानगर, राजस्थान), धनराज इंद्रज जाटव (35, रा.रावला, राजस्थान), मुस्ताक नजर हुसेन (28. रा.रावला, राजस्थान) यांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बिजासन पोलीस चौकी प्रभारी संजय शर्मा, हवालदार हरीओम यादव कालूसिंग,ख कॉन्स्टेबल अजय यादव, बॉबी ठाकूर, कॉन्स्टेबल राधेश्याम आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !