भुसावळातील विवाहितेचा पतीनेच केला खून : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

अवघ्या चार तासात पोलिसांनी उघड केला गुन्हा ः कौटुंंबिक वादातून खुनाचा संशय


भुसावळ : भुसावळातील कवाडे नगरातील रहिवासी असलेल्या सुचिता शुभम बारसे (25) या विवाहितेचा चाकूचे वार करून निर्घृण करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली होती. पोलिसांनी अवघ्या चार तासात खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे. महिलेचा पती तथा संशयीत आरोपी शुभम चंदन बारसे (26, कवाडे नगर, भुसावळ) यानेच हा खून केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

निर्जन जागी पत्नीला नेत केला खून
संशयीत आरोपी पतीने सुचिता बारसे (25) व शुभम बारसे यांच्यात या ना त्या कारणावरून खटके उडत असल्याने आरोपीने पत्नीला एका ठिकाणावरून नेत आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलिस चौकीमागील जंगलात रात्रीच्या सुमारास आणले. घरातील चाकूच्या सहाय्याने पत्नीवर आधी सपासप वार केले व नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस यंत्रणेने धाव घेतली. काही वेळेतच उपस्थित नागरीकांच्या माध्यमातून मृत महिलेची ओळख पटवण्यात यश आले.

पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळी
महिलेचा खून झाल्याची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी, बाजारपेठचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भुसावळ ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले.

अकस्मात मृत्यूवरून झाली होती खुनाची उकल
व्यसनी पतीकडून सतत होणारी मारहाण व शिविगाळ यास कंटाळून शहरातील 46 वर्षीय विवाहितेने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना भुसावळातील लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे वर्षभरापूर्वी घडली होती. या घटनेत गणेश प्रभाकर महाजन (50, रा.लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे, भुसावळ) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संशयीत आरोपी पत्नी सीमा गणेश महाजन (46, रा.लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे, भुसावळ) यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. विशेष बाब म्हणजे, वर्षभरापूर्वी हा गुन्हा घडला असलातरी अकस्मात मृत्यूचा अंतिम अहवाल पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांना शंका आली व डॉक्टरांचा स्वयंस्पष्ट अहवाल घेण्याचे त्यांनी सूचित केले. हा अहवाल खुनाची उकल करण्यात महत्वाचा दुवा ठरला.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !