आधी लग्नाचे आमिष नंतर केला वारंवार बलात्कार
अत्याचारातून पीडीता गर्भवती : तरुणाविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रेमसंबंध जुळल्यानंतर विवाहितेने पतीला सोडत माहेर गाठले. माहेरी आल्यानंतर विवाहिता आणखी 26 वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली. आरोपीने लग्नाचे आमिष देत वारंवार शारीरीक संबंध ठेवले मात्र तरुणाने लग्नाला नकार दिल्यानंतर पीडीतेने पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रार करणारी महिला 28 वर्षांची आहे. आरोपीचे नाव शेख शहजाद शेख गफ्फार (26, रा. सक्करदरा) असे आहे.
वारंवार अत्याचाराचा आरोप
पीडीता शेख शहजादकडे कामाला लागली. या दरम्यान तिचे शहजादशी सुत जुळले. अविवाहित असलेल्या शहजादने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि 1 फेब्रुवारी 2020 ते 30 ऑक्टोबर 2021 या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती तीन महिन्यांची गर्भवती झाली. तिने आरोपी शहजादकडे लग्नाचा तगादा लावला. परंतु, तो टाळाटाळ करीत होता. दरम्यान, त्याला बघायला स्थळ यायला लागली. यामुळे, महिलेने त्याला लग्नाची गळ घातली यावरुन दोघांत 30 ऑक्टोबरला कडाक्याचे भांडण झाले. त्याने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात आरोपी शहजादविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.


