अॅड.रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध : रावेरात राष्ट्रवादीचे निवेदन
रावेर : जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अॅड..रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लयचा रावेरातील राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी निषेध केला असून या संदर्भात दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी बुधवारी तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना माजी आमदार अरुण पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, जि.प.चे माजी अध्यक्ष मुरलिधर तायडे, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तालुका सरचिटणीस वाय.डी.पाटील, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, महिला जिल्हा सरचिटणीस माया बारी, रावेर शहराध्यक्ष शेख मेहमूद, महिला तालुका सरचिटणीस सुरेखा सोनवणे, कमल पंत, आशा सोनवणे, निंभोरा माजी सरपंच डिगंबर चौधरी, वडगाव सरपंच धनराज पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले, रावेर लोकसभा संघटक शशांक पाटील, रावेर बाजार समिती सभापती पितांबर पाटील, सिद्धार्थ तायडे, मागासवर्गीय सेलचे कार्याध्यक्ष पंकज वाघ, जीवन बोरनारे, चेतन पाटील, अरविंद पाटील, अरविंद महाजन, श्रीकांत चौधरी, गुणवंत भंगाळे, रवींद्र भोगे, केतन पाटील, नितीन पाटील, मोहित पाटील, प्रदीप पाटील, नवाज पिंजारी, शाहरुख खान, नदीम शेख, प्रशांत पाटील, सोनू पाटील, चिंतन आसेकर आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


