30 वर्षीय तरुणाने उचलले धक्कादायक पाऊल : विष प्राशन करीत आत्महत्या


साक्री : तालुक्यातील हारपाडा गावातील तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अविनाश यशवंत पवार (30) असे मयत तरुणाचे नाव आहे. अविनाश या तरुणाने राहत्या घरी विषारी द्रव औषध सेवन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला पिंपळनेर ग्रामीण रुग्णालय व तेथून हिरे रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !