फुटबॉल स्पर्धेत भुसावळात भोळे महाविद्यालयाचा फुटबॉल (पुरुष) संघ विजयी


भुसावळ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन फुटबॉल (पुरुष) स्पर्धा श्री संत मुक्ताई महाविद्यालयात झाल्या. या स्पर्धेत दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाने फुटबॉलमध्ये विजेतेपद पटकाविले. प्रथम फेरीत रायसोनी आय.बी.एम.महाविद्यालयावर 02-01 गोलने विजय मिळवला तर उपांत्यफेरीत पी.जी.जिमखाना विद्यापीठ, जळगाव यांच्यावर 04-03 गोलने विजय मिळवून अंतिम फेरीत अ‍ॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालयाचा 4-1 ने गोलने पराभव करीत विजय मिळवला.

यांनी केली उत्कृष्ट कामगिरी
या स्पर्धेत अभिषेक पहुरकर, प्रज्वल कळमसरे, निखील सोनवणे, अभिषेक खरात, ओवेस देशमुख, चेतन डोचणीया, प्रदीप मिरगे, दिग्विजय दाभाडे, संयोग देशमुख, ईम्रान खान, स्वप्नील तायडे, सोहेल खान, रोहित गायकवाड, साहिल पगारे, भावेश तायडे, हर्षल सोनवणे यांनी उत्कृष्ट खेळ केला. यश प्राप्त खेळाडूंचा सत्कार सिनेट व व्यवस्थापन परीषद सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी केला. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.एस.डी.चौधरी उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने अभिनंदन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !