आंतर महाविद्यालयीन हॅण्डबॉल स्पर्धेत भुसावळातील भोळे महाविद्यालयाचा संघ उपविजयी


भुसावळ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन हॅण्डबॉल (पुरुष) स्पर्धा नुकत्याच केसीई बी.पी.एड.कॉलेज, जळगाव येथे झाल्या. या स्पर्धेत दा.दे.ना.भोळे महाविद्यालयाने केसीई पी.जी.महाविद्यालय जळगाव विरोधात 07-02 गोलने विजय मिळविला. अंतिम सामन्यात एम.जे.महाविद्यालयाचा संघ विजयी झाला तर भोळे महाविद्यालयाचा संघ उपविजयी ठरला.

यांची होती उपस्थिती
या स्पर्धेत साहिल संघरत्न पगारे, यशवंत ठाकूर, रवी गायकवाड, राहुल भोई, स्वप्नील तायडे, लोकेश सपकाळे, रोहित मोरे, आदर्श तुरकेले, दिग्विजय दाभाडे, इकबाल सिकलकर, धीरज परदेशी, चेतन केर्‍हाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करून विजय मिळवला. यशस्वी खेळाडूंमुळे सिनेट व व्यवस्थापन परीषद सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी प्रा.डॉ.संजय डी.चौधरी, प्रा.अनिल सावळे उपस्थित होते. प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण आदी खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना महेश शिरतुरे, पवन पारधे व शारीरीक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !