अटकेची टांगती तलवार : आमदार नितेश राणे यांचा जामीन फेटाळला


सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर तो गुरूवारी फेटाळण्यात आल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court)या निर्णयाविरुद्ध धाव घेण्यात येत असल्याची माहिती आहे.

प्राणघातक हल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून यातील मुख्य सूत्रधार हा सचिन सातपुते असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या वरूनच पोलिसांकडून आमदार नितेश राणे (Nitesh Rane) याच्या अटकेची तयारी केली होती तत्पूर्वी त्याची नोटीस देऊन चौकशी ही करण्यात आली होती मात्र आमदार राणे यांनी पोलीस कारवाई पूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता याची सुनावणी गेले तीन दिवस सुरू होती मात्र यावर निर्णय झाला नव्हता गुरुवारी यावर अंतिम निकाल देण्याचे न्यायालयाने बुधवारी सांगितले होते त्याप्रमाणे सकाळपासूनच काय निकाल न्यायालय देईल याची उत्सुकता शिगेला ताणली होती त्याप्रमाणे संध्याकाळी उशीरा त्याबाबतचा निर्णय आला असून यात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना दणका दिला असून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !