पाचोरा शहरातील अॅड.दिनकर देवरे यांचे हृदयविकाराने निधन
पाचोरा : तालुक्यातील लासुरे गावातील मूळ रहिवासी हल्ली पाचोरास्थित संघवी कॉलनीतील प्रसिध्द वकील अॅड.दिनकर देवरे यांचे (68) शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
पाचोरा परीसरात शोककळा
अॅड.देवरे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस गावच्या सरपंच पदापासून सुरूवात केली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्यावर तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली व त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडल्याने त्यांची पाचोरा कृषी बाजार समितीचे सभापतीपदी वर्णी लागली. माजी आमदार कै.आर.ओ. (तात्या) पाटील व आमदार किशोर पाटील यांचे ते अतिशय विश्वासू पदाधिकारी होते. दरम्यान, त्यांच्या निधनाने पाचोरा शहर आणि लासूरे गावात मोठी शोककळा पसरली आहे.


उद्या अंत्यसंस्कार
अॅड.दिनकर देवरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन भाऊ, बहिण असा परीवार आहे. अॅड.देवरे यांच्या पार्थिवावर शनिवार, 1 जानेवारी सकाळी 10 वाजता लासुरे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते जागृती विद्यालयाचे क्लार्क शरद माधवराव देवरे, आदर्श शेतकरी अंकुश व भरत देवरे यांचे बंधू होत.
‘ओमिक्रॉन’ संकट : जळगाव जिल्ह्यात हे कडक निर्बंध झाले लागू
