राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश चिटणीसपदी प्रा.जतीन मेढे यांची नियुक्ती


भुसावळ : प्रागतिक चळवळीचे अभ्यासक आणि वक्ते प्रा.डॉ.जतीन मेढे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले आहे. फुले -शाहू-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक असलेले प्रा.डॉ.मेढे हे कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद ता-यावल येथे मराठी विभाग प्रमुख असून विद्यार्थी जीवनापासून ते सामाजिक आणि राजकीय चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी विधानसभेचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, गुलाबराव देवकर, डॉ.सतीष पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, अ‍ॅड.रोहिण खडसे-खेवलकर, प्रा.सुनील नेवे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !