जळगावनजीक अज्ञातांनी केली शिवशाही बसवर दगडफेक

जळगावातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


जळगाव : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव घाट येथे शिवशाही बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून नुकसान केल्याची घटना शुक्रवार, 31 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञातांच्या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्रूा
जळगाव आगाराची शिवशाही (बस क्रमांक एम.एच.18 बी.जी. 871) ही औरंगाबाद येथून जळगावकडे येत असतांना शुक्रवार, 31 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली. यात बसच्या समोरील काच फोडला आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर बस वाहक युवराज प्रधान कोळी व बसचालक रोहन संजय पाटील (28, रा.हिंगोणा, ता.चोपडा) यांनी शिवशाही बस थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणली. बसचालक रोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री 9 वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गफुर तडवी करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !