भुसावळचे आमदार सावकारे यांचे वाहन परस्पर परीवहन मंत्र्यांच्या नावावर : अज्ञाताविरोधात अखेर गुन्हा
जळगाव : भुसावळातील भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनी इनोव्हा वाहन विक्री केलेले नसताना वा कुणाला ट्रान्सपर केले नसताना अज्ञातांनी परस्पर हे वाहन परीवहन मंत्री अनिल परबांच्या नावावर केल्यादायक प्रकार उघडला होता., या प्रकरणी आमदाररांनी आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परीरवहन अधिकार्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी उपप्रादेशिक परीवहन अधिकारी शाम लोही यांच्या फिर्यादीवरुन जळगाव सायबर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव आरटीओ कार्यालयाचा भोंगळ कारभार : भुसावळचे आमदार संजय सावकारेंची चारचाकी परस्पर केली मंत्री अनिल परबांच्या नावावर
सायबर पोलिसात गुन्हा दाखल
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची चारचाकी (एम.एच.19 सी.झेड.5130) ही बनावट स्वाक्षरी, बनावट कागदपत्रांच्या आधारावर चक्क परीवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सपर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. शुक्रवार, 31 डिसेंबर रोजी आमदार संजय सावकारे यांनी आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडे तक्रार केली होती. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात शनिवार, 31 डिसेंबर रोजी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.


‘कारनामा’ गुजरातमधून घडल्याचा संशय
वाहन परस्पर नावावर करण्यासाठी संशयीताने गुजरातमधून राज्य परीवहन विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करून क्रमांक बदलल्याचा संशय आहे. सायबर सेलकडून आता तपास करताना या बाबी उघड होणार आहे. एखाद्या अधिकार्याला बदनाम करण्यासाठी वा आरटीओ विभागाची बदनामी करण्यासाठी हा प्रकार घडल्याची शंका आहे.
दोषी अधिकार्यांवर कारवाईचे संकेत
खातरजमा न करता स्वाक्षर्या करणार्यांवर कारवाईचे संकेत परीवहन विभागाचे आयुक्त डॉ.अविवनाश ढाकणे यांनी दिल्याने अधिकार्यांवर कारवाई अटळ आहे. जळगाव आरटीओ कार्यालयातील तीन लिपिकांसह एआरटीओ यांच्या स्वाक्षरीने हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. या गंभीर प्रकाराची बारकाईने चौकशी करून डॉ.ढाकणे यांनी श्याम लोही यांच्याकडून अहवाल मागितला आहे.
यापूर्वी दिले होते मंत्र्यांच्या नावाने लायसन्स
यापूर्वीदेखील जळगाव आरटीओ कार्यालयातून मंत्र्यांच्या नावाने लायसन्स् दिले गेले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. असे असतांनाही आतातर चक्क, आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची गाडी परीवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करून नोंदणी केली गेली आहे.
