बालिकेच्या विनय भंगानंतर जमावाची पोलिसांवर दगडफेक ; पोलिस वाहनाच्या काचा फोडल्या


जामनेर : शहरातील बालिकेचा एका वृध्दाने विनयभंग केल्याची घटना घडल्यानंतर त्याला जमावाने चोप दिल्याची घटना शहरात घडली. जामनेरातील जुना बोदवड रोडवरील घरकुलातील रहिवासी हाफिस बेग मेहमूद बेग (58) या वृद्धाने परीसरातील सहा वर्षीय बालिकेला, खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून तिचा विनयभंग केला. बालिकेच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच ते संशयिताच्या घराकडे आले असता त्या वृद्धाने बालिकेच्या कुटुंबियांशी अरेरावी केल्याने जमावाने त्याला जोरदार चोप दिला.

पोलिसांच्या वाहनावर दगडफेक
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण शिंदे हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी आले. संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. यात पोलिसांच्या वाहनाची काच फुटून चार पोलिस जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली. याप्रकरणी बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादिवरून हाफिस बेग याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.



लग्नात चोरट्यांनी मारला साडेसहा लाखांच्या दागिण्यांवर डल्ला : चाळीसगाव तालुक्यात या गावातील घटना…! 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !