सावद्यात पाटील परीवार कुलवृत्तांत पुस्तकाचे प्रकाशन

गावातील प्रत्येक कुटूंबाचा इतिहास अशा पद्धतीचा असावा : खान्देशरत्न भक्ती किशोरदासजी शास्त्री यांची भावना


फैजपूर : हंबर्डी येथील लेखक खेमचंद पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रविवार, 26 डिसेंबर रोजी खेमचंद पाटील स्वलिखीत ‘पाटील परीवार कुलवृत्तांत’ या पुस्तकांचे प्रकाशन स्वामीनारायण गुरुकुलमध्ये व्याकरणाचार्य तथा खान्देश रत्न भक्ती किशोरदासजी शास्त्री यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

येत्या पिढीला जाणीव असणे गरजेचे
प्रसंगी भक्ती किशोरदास म्हणाले, समाजाचे व पाटील परीवाराचे ऋण उतरावं काहीतरी समाजाचे आपण देणे लागतो या उद्देशाने त्यांनी हंबर्डी येथील पाटील परीवार कुलवृत्तांत या पुस्तकाचे प्रकाशन केले असून ही बाब खूपच प्रशंसनीय आणि वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक कुटूंबाचा इतिहास अशा पद्धतीचा असावा शिवाय हंबर्डी गावात निवास करणारा पाटील परीवार व लेवा समाज कुठून, केव्हा-केव्हा आला आणि त्यांची आता कोणती पिढी आहे हे सगळं आवश्यक आहे कारण येणार्‍या पिढीला या सगळ्या गोष्टींची जाणीव असणे फार गरजेचे आहे. ह्या पुस्तकात लेखक खेमचंद पाटील यांनी कुलदेवता, गोत्र , देवाचा दिवस यासह नेमका काय पूजा विधी आपल्या आपल्या परीवारात केला जातो, त्या सगळ्या गोष्टींचा समावेश या पुस्तकात समावेश केला आहे. अशा या पुस्तकांची सध्याच्या काळात गरज आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी त्यांच्या आजी-आजोबांच्या आत्म्यास समर्पित केलेले आहे. खेमचंद पाटील सारखा तरुण नक्कीच समाजासाठी व संपूर्ण परीवारासाठी प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.

पाटील परीवारात जन्माला आल्याचा अभिमान
लेखक खेमचंद पाटील बोलतांना म्हणाले की, पाटील परीवारात तसेच लेवा पाटील समाजात जन्माला आल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी माझ्या परीवाराचे आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने ‘पाटील परीवार कुलवृत्तांत’ या पुस्तकाचे लिखाण केले आहे. माझ्या लिखाणाची परीवारासह समाजाच्या इतिहासात जेव्हा नोंद ठेवली जाईल त्याच दिवशी माझ्या जगण्याचे सार्थक होईल या उद्देशाने या पुस्तकाचे लेखण केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !