जुन्या भांडणातून कुटुंबास मारहाण : भडगाव तालुक्यातील घटना
भडगाव : तालुक्यातील वडजी येथील कुटुंबाला मागील भांडणाच्या कारणावरून पाच जणंनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या भांडणातून मारहाण
पुरुषोत्तम देवराम मोरे (56, रा.वडजी, ता.भडगाव) हे मुलगी ज्योती व पत्नी अंजनाबाईसह वास्तव्यास आहेत. शुक्रवार, 31 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास पुरुषोत्तम मोरे हे त्यांच्या वडजी शिवारातील शेतात कामानिमित्त गेले असता गावातील शिरीष देवराम मोरे याने मागील भांडणाचे कारणावरून शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आशाबाई शिरीष मोरे, चंद्रमणी शैलेश मोरे, मायाबाई देवराम मोरे, छायाबाई देवराम मोरे (वडजी, ता.भडगाव) यांनी अंजनाबाई आणि मुलगी ज्योती यांना मारहाण केली. या प्रकरणी पुरुषोत्तम मोरे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक मनोज माळी करीत आहे.




