काय सांगता ! थर्टी फर्स्टला भुसावळकरांनी रीचवली 11 हजार लिटर दारू


भुसावळ : सरत्या वर्षाला निरोप देताना 31 डिसेंबरला भुसावळकरांनी तब्बल 11 हजार लिटर दारू रीचवली. त्यात देशी, विदेशी दारूसह बिअर आणि वाइनचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 3 हजार लिटरने कमी आहे. शिवाय यंदा देशीकडे कल अधिक दिसून आला. दरम्यान, रात्री 9 ते पहाटे 5 अशी जमावबंदी असली तरी पोलिसांना हुलकावणी देत काहींनी शहरालगतच्या शेतांमध्ये पार्ट्या केल्या. बहुसंख्य नागरीकांनी मात्र रात्री नऊच्या आत घरी जाणे पसंत केले. यानंतर टोळक्याने फिरणारे, हातगाड्या, दुकाने, हॉटेल सुरू ठेवणारे मिळून पोलिसांनी 294 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. केवळ चार तासांत 1 लाख 36 हजार 700 हजार रूपये दंड वसूल केला.

प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी
एकीकडे ओमायक्रॉनची भीती असली तरी थर्टी फर्स्टला गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून सरकारने रात्री 9 ते पहाटे 5 अशी जमावबंदी लावली आहे. स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी व्यावसायिक, विक्रेते, नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले होते. तसेच सक्तीचे पालन करण्यासाठी पोलिसांनी रात्री 9 वाजेनंतर धडक कारवाई केली. त्यासाठी सहा ठिकाणी नाका बंदी केली. फिरते पथके देखील गस्तीवर होते. डीवायएसपींसह सर्व पोलिस ठाण्याचे प्रमुख अधिकार्‍यांनी गस्त केली. रात्री 9 वाजेनंतर हॉटेल्स, ढाबे, बिअरबार, परमीटरुम बंद झाले. –

सरत्या वर्षात अशी रीचवली भुसावळकरांनी दारू
सन 2021- 11,010 लिटर
देशी दारू- 6,177 लिटर
विदेशी दारू- 2,984 लिटर
बिअर- 1,812 लिटर
वाईन- 37 लिटर

नियम मोडणार्‍या 294 जणांवर दंडात्मक कारवाई
थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर शहरातील चिकन, मटण विक्रेत्यांकडे सकाळी 10 वाजेपासून ग्राहकांची गर्दी होती. कोरोना संचार बंदीमुळे रात्री उशिरापर्यंत हॉटेल, ढाबे सुरू राहणार नाही हे गृहीत धरून घरीच अथवा अपार्टमेंटच्या गच्चीवर पार्ट्या करणार्‍यांची संख्या अधिक होती. त्यात अनेकांनी नॉनव्हेजला पसंती दिली त्यामुळे शहरातील विविध भागातील 55 ते 60 विक्रेत्यांकडून 3 हजार 750 किलो चिकनची विक्री झाली. सुका चिकन 180 रूपये, तर जीवंत चिकनची 105 रूपये प्रमाणे विक्री झाली. त्यातून 6 लाख 75 हजार रुपयांची उलाढाल झाली.

पोलिसांना पाहून बदलले रस्ते
पोलिसांनी शहरात मोक्याच्या ठिकाणी नाका बंदी केली होती. तेथे सुरू असलेली कारवाई पाहून रस्ता बदलणार्‍यांची संख्या जास्त होती. पोलिसांना चुकवत अनेकांनी घर गाठले. तरीही पोलिसांनी अवघ्या चार तासात एक लाखाच्या आसपास दंड वसूल केला. 172 दुचाकी स्वारांकडून 78 हजार 350, विना मास्क फिरणार्‍या 103 जणांनी 18 हजार 350, नियम धुडकावणार्‍या 8 दुकानदारांकडून 4 हजार रुपये दंड वसूल केला. मद्यपान करून वाहन चालवणार्‍या 11 जणांवर गुन्हे दाखल केले. डीवायएसपी वाघचौरे, निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक प्रताप इंगळे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक स्वप्निल नाईक यांनी रात्रभर गस्त केली.

दहिगावातील तरुणीची विष प्राशनाने आत्म्हत्या 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !