बीएचआर प्रकरण : जितेंद्र कंडारेची कारागृहात रवानगी


जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यास शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यास कोठडी सुनावली व नंतर कंडारेची कारागृहात रवानगी करण्यात आली.

डेक्कन पोलिसात दाखल आहे गुन्हा
कंडारेविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात 25 डिसेंबर रोजी जामीन मिळाला तर 25 रोजी त्याला शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. संतोष काशीनाथ कांबळे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी बीएचआरमध्ये ठेवलेली 18 लाख 7 हजार 159 रुपये परत मिळालेले नाहीत. दरम्यान, या गुन्ह्यात सुरूवातीला त्याला पाच व नंतर चार अशा एकुण नऊ दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली. यात काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी मिळवले. शनिवारी कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !