वाहनधारकांना सूचना : भादली रेल्वे गेट उद्या राहणार बंद


भुसावळ : जळगाव-भादली मार्गावरील रेल्वेरूळ बदलण्याचे काम प्रशासनाने हाती घेतल्याने शनिवार तसेच रविवारी भादली रेल्वे गेट बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. या कामाचा रेल्वे दळणवळणावर कोणताही परीणाम होणार नाही.

रेल्वे रूळ बदलण्याच्या कामाला वेग
मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातील जळगाव-भादली दरम्यान रेल्वे रूळ बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लेव्हल क्रॉसिंग गेट 149 हे 2 व 3 जानेवारी या काळात बंद राहणार आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत गेट बंद ठेवण्यात येईल. या मार्गाने ये-जा करणार्‍या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !