धमकी देत तरूणाची दुचाकी लांबविली
चोपडा : ‘पैसे निकालो, नही तो मार डालेंगे’ अशी धमकी देत तरुणाची दुचाकी अडवून ती लांबविल्याची घटना आडगाव-विरवाडे रोडवर घडली. चोपडा शहर पोलीसात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल
इकबालोद्दीन समशोद्दीन जहागिरदार (37, रा.चोपडा, जि.जळगाव) हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. गुरुवार, 30 डिसेंबर रोजी रात्री 11 ते 11.15 वाजेच्या दरम्यान ते दुचाकी (एम.एच.19 सी.सी.8205) ने घरी जात असताना आडगाव-विरवाडे रस्त्यावर अज्ञात दोन जणांनी त्यांच्या दुचाकीला हात देत दुचाकी थांबविली. यावेळी अज्ञातांना त्याचा हात पकडून ‘पैसे निकालो नही तो मार डालेंगे’ असे म्हणून जबरीने पैसे मागितले. इकबालोद्दीन हे भितीने दुचाकी सोडून पळाले. त्यावेळी अज्ञात दोन जणांनी त्यांची दुचाकी घेवून पळ काढला. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार दीपक विसावे करीत आहे.




