नांद्रा येथील विद्यार्थ्याचा गिरणा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू


पाचोरा : तालुक्यातील नांद्रा येथील 17 वर्षीय विद्यार्थ्याचा गिरणा नदीपात्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. हर्षल संजय तावडे (17, रा.नांद्रा, ता.पाचोरा) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मित्रांसोबत पोहताना दुर्घटना
रविवार, 2 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पाच मित्रांसोबत हर्षल माहेजी येथील गिरणा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षल हा बुडाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरीकांना धाव घेतली. हनुमंतखेडा येथील नावेकरांनी शोध घेवून हर्षलचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.





जळगावात घेत होता शिक्षण
हर्षलने दहावी उर्त्तीर्ण केल्यानंतर जळगाव येथे बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता. संजय अवचित तावडे यांना दोन मुले असून हर्षल हा लहान असल्याचे सांगण्यात आले. वडील शेतीचा व्यवसाय करतात व अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत मुलांचे संगोपन करीत असतानाच ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. नांद्रा पोलिस पाटील यांच्या खबरीनुसार पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्यामकांत पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !