गुजरातचा कुख्यात गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात : प्रेयसीला भेटण्यापूर्वी अमळनेरात कारवाई


जळगाव : गुजरातमधील अट्टल गुन्हेगाराला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून अटक करण्यात आली. यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी स्पेशल ऑपरेशन ग्रुप, सुरत सिटी याच्या ताब्यात दिले आहे.

आरोपीविरुद्ध दहा गुन्हे दाखल
गुजरात राज्यातील डिंडोली पोलीस स्टेशन (गुजरात) रजि नं. ३८२९/२०२१ भा.द.वि. ३८६, ५०४, ५०६ (२), १४३,१४४, १४८, १४९, GUJCTOC Act ३(१)(१), ३(१)(२), ३(२), ३(४) या गुन्ह्यातील आरोपी कैलास आधार पाटील (वय २८ रा. महादेव नगर सोसायटी, नगम डिंडोली, सुरत) हा जळगाव जिल्ह्यात लपून बसला असल्याची गुप्त माहिती स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना दिली होती. या माहितीच्या आधारे कैलासचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमंलदार सफो अशोक महाजन, पोह संदीप रमेश पाटील, पोना प्रविण मांडोळे, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील असे पथक नेमुन त्यांना आदेश देवून टीम तयार करण्यात आली होती.





प्रियसीला भेटण्यापूर्वी आवळल्या मुसक्या
आरोपी कैलास पाटील हा पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथील जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर अधिक तपास केला असता कैलास पाटील हा रात्री अमळनेर येथे त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी जाणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. यानंतर मंगरुळ – पारोळा रोडवर एलसीबीच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व पथकातील कर्मचारी व स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी गुजरात राज्य यांनी संयुक्तरीत्या सापळा रचून त्यास अटक केली. यानंतर कैलासला पुढील कारवाईसाठी स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी यांच्या ताब्यात देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !