नांद्रा येथे मुलाकडून बापाला मारहाण ; जळगाव तालुका पोलिसात गुन्हा
जळगाव : जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द मुलाकडून बापाला लाकडी फावड्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सायंकाळी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
वडिलांना केली मारहाण
जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानकीराम दगडू सोनवणे (६५, रा.नांदुरा खुर्द, ता.जि.जळगाव) हे मुलगा हिरामण सोनवणे यांच्यासह राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून मुलगा हिरामण सोनवणे हा काही एक कामधंदा करीत नसल्याने वडील जानकीराम सोनवणे हे चिंतेत होते. याबाबत रविवार, २ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जानकीराम सोनवणे यांनी मुलगा हिरामण याला कामधंदा का करत नाही ? असा जाब विचारला याचा राग हिरामणला आल्याने त्याने घरात असलेल्या लाकडी फावड्याने वडील जानकीराम यांना मारहाण बेदम मारहाण केली. यात त्याचा हाताचा पंजा मोडून गंभीर जखमी केले. या प्रकरणी जानकीराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून मुलगा हिरामण जानकीराम सोनवणे याच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साहेबराव पाटील करीत आहे.




