कोरोना संकट : भुसावळसह जळगाव जिल्ह्यात १६ रूग्ण आढळले


जळगाव : जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १६ बाधीत रूग्ण आढळून आले आहे तर १ बाधीत रूग्ण बरा होवून घरी पतरला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवली आहे.

१६ बाधित रूग्ण आदळले
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जळगाव- ५,
भुसावळ तालुक्यात- ६,
चोपडा तालुक्यात- १,
चाळीसगाव- २,
मुक्ताईनगर- २

२५७९ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८५४ हजार बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३६ बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !