धूम स्टाईल येत भामट्यांनी तरुणीच्या हातातील मोबाईल लांबविला


जळगाव : शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाजवळ तरुणी मोबाईलवर बोलत असतांना अज्ञात चोरट्यांनी हातातून हिसकावून लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात आरोपींना शोधण्याचे आव्हान
माधुरी धोंडू मिस्तरी (25, रा.रेणुका नगर, वरणगाव, ता.भुसावळ, ह.मु. प्रताप नगर, जळगाव) या शिक्षण घेत असून सोमवार, 3 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नूतन मराठा महाविद्यालयाजवळ एका ठिकाणी मोबाईलवर बोलत असतांना त्यांच्या पाठीमागून अज्ञात दोन जण आले व त्यांनी तरुणीच्या हातातील सात हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून लांबविला. त्यांनी आरडाओरड केली परंतू काही वेळातच दोघे अज्ञात चोरटे पसार झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री 11 वाजता तरूणीने तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !