पेपर कटींग मशीन चोरट्यांनी लांबवले


जळगाव : ममूराबाद रोडवरील एका हॉटेलच्या मोकळ्या जागेतून 30 हजार रुपये किंमतीची पेपर कटींग मशीन चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
प्रसाद संजय कासार (23, रा.चौगुले प्लॉट, मारुती मंदिराजवळ, जळगाव) यांचे ममुराबाद रोडवरील हॉटेल श्री च्या बाजूला मोकळ्या जागेत सुरज बँड कंपनीचे पेपर कटींग मशीन लावले होते. 1 ते 15 डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची पेपर कटींग मशीन चोरुन नेले. सोमवार, 3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता जळगाव तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !