जळगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भाऊराव नाखले यांची हकालपट्टी


जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या महाविद्यालय परीषद बैठकीत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले यांची हकालपट्टी करीत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक पदाची व उपअधिष्ठात्यांची नेमणूक महाविद्यालय परीषदेत घोषित केली. रुग्णालय कारभाराविषयी ताशेरे ओढत यावेळी विभागप्रमुखांना फैलावर घेण्यात आले.

जीएमसी परीषदेत हकालपट्टीचा निर्णय
मंगळवारी महाविद्यालयातील विभागप्रमुखांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत यापुढे कामात ढिसाळपणा झाल्यास व रुग्णसेवेत हलगर्जीपणा आढळल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल, असा इशारा डॉ.रामानंद यांनी दिला. डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी पदभार घेतल्यानंतर मंगळवारी महाविद्यालय परीषदेची पहिली बैठक घेतली. बैठकीत रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. रुग्णालयात रुग्ण दाखल करताना होत असलेली गैरसोय व रुग्णांना येणार्‍या अडचणी, वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचे ढिसाळ, विस्कळीत नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यामुळे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले यांना फैलावर घेत त्यांची तत्काळ हकालपट्टी केली व कामकाज तात्पुरत्या स्वरूपात दंतशल्य चिकित्सा विभागप्रमुख डॉ. इम्रान पठाण यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत गुरुवारी नियुक्ती करण्यात येणार आहे. उपअधिष्ठातापदी डॉ. पोटे व डॉ. इंगोलेबैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपअधिष्ठाता म्हणून शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे (पदव्युत्तर) व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले (पदवीपूर्व) यांची निवड झाली.





तिसर्‍या लाटेसाठी सज्ज
बैठकीमध्ये कोरोना महामारीच्या तिसरा लाटेच्या पूर्वतयारीविषयी चर्चा करण्यात आली. त्यासाठी लागणार्‍या विविध साधन सामग्री, मनुष्यबळ याबाबत माहिती घेऊन सज्ज राहण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !