जळगावातील विवाहितेचा विनयभंग : रीक्षा चालकाविरोधात गुन्हा


जळगाव : रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या भाजीपाला विक्री करणार्‍या 36 वर्षीय विवाहितेला अश्लिल शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणाविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एक वर्षांपासून विवाहितेचा पाठलाग
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका भाजीपाला विक्री करणार्‍या 36 वर्षीय महिला आपल्या पती व मुलांसह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्याच भागात राहणारा संशयीत आरोपी दिनेश रवींद्र बारी (25) हा विवाहितेचा गेल्या एक वर्षांपासून पाठलाग करत आहे. आरोपीने विवाहितेला फोनवर अश्लील शिविगाळ करून पती व मुलांना सोडून माझ्याकडे रहा. असे बोलून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सोमवार, 3 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता घडला. या प्रकरणी विवाहितेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात मंगळवार, 4 जानेवारी रोजी रात्री धाव घेऊन रीक्षा चालकाविरोधात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दिनेश रवींद्र बारी याच्याविरोधात रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !