मेहुणबारे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रपतींना पत्र ; मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या


मेहुणबारे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी भारताचे राष्ट्रपती यांना पत्र लिहिण्यात आला. गुरुवार, 5 जानेवारी 2022 रोजी मेहुणबारे येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. उपक्रमांतर्गत इयत्ता सातवी ते बारावीच्या सुमारे 50 विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात पत्र लेखन केले. ज्याद्वारे मराठी भाषेची महानता विशद करण्यात आली तसेच मराठी भाषेच्या योगदानाविषयी सुंदर मजकूर लिहून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठ राष्ट्रपती महोदयांकडे विनंती करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वैभव ईश्वरलाल चौधरी अध्यक्षस्थानी होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन बर्डे, भूषण पाटील, संदीप मराठे, विश्वास चौधरी, दिगंबर कुलकर्णी या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !