कोरोना विस्फोट : शाळा, महाविद्यालये बंद ; अखेर राज्यात निर्बंध लावले ; एका क्लिकवर जाणून घ्या नियमावली
मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) उद्रेक सातत्याने होत असताना लॉकडाऊन (Lockdawn) लावण्यात येणार असल्याची भीती जनतेतून व्यक्त होत असतानाच शासनाने मात्र लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. या नियमावलीची अंमलबजावणी सोमवार, 10 जानेवारीपासून होणार आहे. तसेस हे निर्बंध 15 फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील, असे राज्य सरकारने (State Goverment) जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जमावबंदीसह संचारबंदी लागू
नव्या नियमावलीनुसार राज्यात पहाटे पाच ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी, रात्री 11 ते पहाटे पाच दरम्यान संचारबंदी लागू राहणार आहे. त्याबरोबरच सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमधून प्रवास करण्यासाठी दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे मात्र लोकल वाहतुकीवर कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाही. तसेच राज्यातील शाळा आणि महाविद्यालये हे 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
- असे आहेत कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लागू केलेले नवे नियम
- रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू
- राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
- अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध
- सरकारी कार्यालयात भेटणार्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक
- प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही
- लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी
- अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
- सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
- 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
- स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद
- हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार
- पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क
पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे - शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू
- रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे
- नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी
- नाट्यगृह, सिनेमागृहात संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री 10 ते सकाळी आठ दरम्यान सिनेमागृह बंद


