बोदवडला 37 वर्षीय शिक्षिकेचा विनयभंग ; आठ शिक्षकांवर गुन्हा
बोदवड : जिल्हा परीषद उर्दू मुलांच्या शाळेतील 37 वर्षीय शिक्षिकेच्या विनयभंग प्रकरणी शाळेतील तब्बल आठ शिक्षक व शिक्षिकांविरुद्ध शनिवारी रात्री 11 वाजता गुन्हा दाखल झाल्याने शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विनयभंगासह बदनामीचा आरेाप
पीडीत शिक्षिकेच्या तक्रारीनुसार, 16 ऑक्टोबर ते 4 जानेवारी 22 दरम्यान शारीरीक व मानसिक त्रास देण्यात आला. शेख रफिक अहमद ताज (रा. जामनेर) व उर्वरीत शिक्षक, शिक्षिकांनी आपली इतर खेड्यातील शाळेमध्ये बदली होण्याच्या दृष्टीने शेख रफिक यास वेळोवेळी मदत केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून बदनामी करण्याची धमकी दिली. शेख रफिक याने फिर्यादी इयत्ता चौथीच्या वर्गात एकटी बसलेली असताना तिचा विनयभंग केला तसेच शिक्षिकेच्या पतीला पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
आठ शिक्षक, शिक्षिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात शेख रफीक अहमद ताज (रा.भोई नगर, जामनेर), शे.मोहम्मद इसहाक अब्दुलहक, (रा.मलकापूर), समीना बेगम शे.बशीरा (रा.जाम मोहल्ला, भुसावळ), तरन्नुम जहा महंमद खा (रा.मोहम्मदी नगर, भुसावळ), नूरजहाँ बेगम मोहम्मद इस्हाकरा (रा.बिलाल मस्जिद जवळ, भुसावळ), मो. इरफान मो. इब्राहीमरा (रा.हिदायत नगर, बोदवड), ताजुन्निसा शे. कादरा (रा.गुंजाळ कॉलनी, भुसावळ) व शाह रफिक अहमद फारूक शाह (रा.अकोला) यांचा समावेश आहे.


