Beed Accident Update एस.टी.बस-ट्रकमध्ये भीषण अपघात : सहा प्रवासी जागीच ठार
अंबाजोगाई : बस व ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात (Accident) सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 9 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अंबाजोगाई-लातूर रोडवर (Ambajogai-Latur Road) बर्दापूरजवळ नंदगोपाल डेअरीसमोर घडला. लातूर-औरंगाबाद बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होवून अपघातात सहा जण जागीच ठार आणि दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


