जळगावातील जावेद हबीब यांचे दुकान बंद करावे : भुसावळातील राजश्री नेवे यांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी
भुसावळ : प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी एका सेमिनारमध्ये महिलेच्या डोक्यात थुंकल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टिकेचा भडीमार सुरू झाला होता. हा प्रकार म्हणजे समस्त महिलावर्गाचा अपमान असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी भुसावळातील सखी श्रावणी महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नेवे यांनी अॅड.सुनीता खंडाळे-साळशिंगीकर यांच्या माध्यमातून स्थानिक पोलिस प्रशासन व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
जळगाव येथे देखील संबंधिताचे सलून असून तेथेदेखील महिलांचा अपमान होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून जळगावातील दुकान बंद करून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.




