मुक्ताईनगरातील अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर : आरोपींची कोठडीत रवानगी

11 संशयीतांविरोधात गुन्हे : एका संशयीताची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह तर आठ संशयीतांना एका दिवसाची पोलिस कोठडी


मुक्ताईनगर : तालुक्यात अवैध वाहतुकीला ऊत आला असतानाच पोलिसांनी अचानक धाडसत्र राबवत रविवारी पहाटे सात ट्रॅक्टर जप्त करीत 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याने वाळू तस्करांच्या गोटात भीती पसरली होती. या प्रकरणात तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर आली असून महसूल प्रशासनानेही मरगळ झटकण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अटकेतील एका संशयीताला कोरोना
दरम्यान, पोलिसांनी वाळूने भरलेले सात ट्रॅक्टराह 21 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर अटकेतील एका आरोपीची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याने त्यास न्यायालयीन कोठडी (MCR) तर अन्य आठ संशयीतांना एका दिवसांची पोलिस कोठडी (PCR) न्यायालयाने सुनावली. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ (PI Rahul Khatal) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !