वाळूची चोरटी वाहतूक : जळगाव तालुका पोलिसांनी ट्रॅक्टर केले जप्त


जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यात अपयशी ठरला असतानाच पोलिस प्रशासनाकडून मात्र कारवाई केली जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे. जळगाव तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीतून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू वाहतूकदारांमध्ये उडाली खळबळ
जळगाव तालुक्यातील विदगाव येथे असलेल्या तापी नदीच्या पात्रातून बेकायदेशीररीत्या चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील यांनी सोमवार, 10 जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 बी.जी.9422) वर कारवाई केली तर ट्रॅक्टर चालक व मालक ट्रॅक्टर सोडून पसार झाले. तालुका पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन जळगाव तालुका पोलिस ठाण्यात जमा केले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिकल तपास पोलिस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !