जळगावात जन्मदेत्या आईलाच मारला चाकू ; कारण…!


जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको भागात घरगुती भांडणातून मुलानेच आईला चाकू मारत जखमी केले. या प्रकरणी मुलाविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कौटुंबिक वादातून घटना
शमीम बानो शेख पीरन (40) या महापालिकेच्या दवाखान्याच्या मागे पिंप्राळा हुडकोत राहतात. याच ठिकाणी त्यांचा मुलगा तन्वीर शेख जलील (23) हा सुध्दा राहतो. रविवार, 9 जानेवारी रोजी घरगुती भांडणाच्या कारणावरून तन्वीर याने आई शमीम यांच्या उजव्या हातावर भाजी कापण्याचा चाकू मारून दुखापत केली तसेच मारून टाकण्याची धमकी दिली. शमीम बानो शेख नीरन यांनी रामानंदनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत आरोपी तथा मुलगा तन्वीर शेख जलील याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !