व्यवसायासाठी 10 लाख रुपये न आणल्याने विवाहितेला छळले : पतीसह तिघांविरोधात गुन्हा
जळगाव : व्यवसाय करण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये न आणल्याने पतीसह सासरच्या मंडळींनी जळगावच्या विवाहितेचा छळ केला. या प्रकरणी पतीसह सासरच्या तिघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
छळ असह्य झाल्याने पोलिसात तक्रार
गणपती नगरातील माहेर असलेल्या रेखा मराठे यांचा जळगाव शहरातीलच पार्वतीनगर येथील योगेश ऊर्फ गोविंद अरुण मराठे यांच्याशी विवाह झाला असून लग्नानंतर काही दिवसांनी रेखा यांनी व्यवसाय करण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत यावरुन पतीसह सासरच्यांनी छळ करण्यास सुरुवात केली. याच कारणावरून रेखा यास वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करत पतीसह सासरच्यांकडून शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. छळाला कंटाळून रेखा मराठे यांनी सोमवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पती योगेश ऊर्फ गोविंद मराठे, सासू विठाबाई अरुण मराठे, जेठ डिगंबर अरुण मराठे (तिघे रा.पार्वतीनगर, जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास महिला हवालदार रत्ना मराठे करीत आहेत.




