जळगावातील महिलेची सोशल मीडियात बदनामी : अज्ञाताविरोधात गुन्हा


जळगाव : शहरातील एका भागात राहणार्‍या महिलेचे बनावट फेसबुक व इन्स्टाग्रामचे अकाउंट तयार करून त्याद्वारे तिची बदनामी केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेच्या बदनामीप्रकरणी गुन्हा
शहरातील एका भागात 45 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून नोव्हेंबरमध्ये अनोळखी व्यक्तीने महिलेचे बनावट फेसबुक इन्स्टाग्रामचे खाते तयार केले. त्यावरून महिलेच्या ओळखीच्या लोकांना फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली. नोव्हेंबर ते आजपावेतो अशाप्रकारे अनोळखी व्यक्तीने बनावट फेसबुक इन्स्टाग्रामच्या खात्यावरून महिलेच्या नावाचा गैरवापर करीत तिची बदनामी केल्याची तक्रार महिलेने दिल्याने अनोळखी व्यक्तीविरुद्ध जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे व सहकारी करीत आहेत.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !