छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले ; सोबत आले तर आघाडी अन्यथा स्वबळावर लढणार


नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून आगामी होवू घातलेल्या निवडणुकीत सन्मानजनक आघाडी करण्याचा प्रयत्न आहे मात्र काही कारणास्तव तसे न घडल्यास स्वबळावर लढणार असल्याचे सूचक संकेत ओबीसी नेते छगन भुजबळ (Obc Leader Chagan Bhujbal) यांनी येथील बैठकीत दिले. राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक सोमवारी भुजबळ यांच्या उपस्थितीत झाली.

अधिकाधिक उमेदवार निवडून आणा
भुजबळ (Obc Leader Chagan Bhujbal) म्हणाले, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने कोर्टात केस (Court Kess) दाखल करण्यात आली आहे. त्याचा निकाल (Result) लवकरच येईल; परंतु निकालाची वाट न पाहता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) तयारीला लागावे. नाशिक महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP Party) संख्याबळ सध्या जरी कमी असले तरी यंदाच्या वेळेस मात्र आपल्याला ती भरपाई करावी लागणार असून, जास्तीत-जास्त उमेदवार निवडून आणावे लागतील. त्यासाठी पक्षाची (Party) ताकद वाढविण्यासाठी काम करावे.



पदाधिकार्‍यांना देणार जवाबदारी
राज्यात महाविकास आघाडी सरकारला जनतेची पसंती असून, वरिष्ठ पातळीवर सन्मानजनक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तरीदेखील सर्व जागांवर लढायची तयारी करण्यात यावी. त्यासाठी शहरात इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या वॉर्डात निवडणुकीच्या कामाला लागावे. निष्क्रिय पदाधिकार्‍यांना बदलून त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी देण्यात यावी. शहरातील सर्व सहा विभागांत वरीष्ठ पदाधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येऊन जबाबदारीचे वाटप करण्यात यावे, अशा सूचनाही भुजबळ (Obc Leader Chagan Bhujbal) यांनी यावेळी केली.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, अनिता भामरे, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, संजय खैरणार, किशोर शिरसाठ, शंकर मोकळ, मनोहर कोरडे, मुजाहिद शेख, जीवन रायते, मकरंद सोमवंशी, महेश भामरे आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकार्‍यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली मते मांडली. यावेळी आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा उपस्थित पदाधिकार्‍यांनी बैठकीत व्यक्त केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !