चित्रपटात काम देण्यासाठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी
मुंबई : चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने बंगाली अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी आरोपीला मालाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नेटफ्लिक्स वेब सीरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं तिचे काही विचीत्र फोटो काढले होते. त्यानंतर हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली मात्र अभिनेत्रीनं नकार देताच आरोपीने तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. ओमप्रकाश राजू तिवारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
पीडीतेने मागणीला नकार देता फोटो केले व्हायरल
आरोपी आणि पीडिताची सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर आरोपीनं पीडिताला मुंबईतील एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवलं. पीडिता मुंबईत आल्यानंतर आरोपीनं पीडिताला वेब सीरिजमध्ये काम मिळवून देण्याचं बहाण्यानं तिच्याकडं न्यूड फोटोंची मागणी केली. मात्र, काही दिवसानंतर आरोपी पीडिताकडं शरीरसुखाची मागणी करु लागला. परंतु, पीडितानं नकार देताच आरोपीनं तिचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. पीडीतेच्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी आरोपीला अटक केली.




