10 हजार रुपयांची लाच घेताना लाचखोर मंडळाधिकारी एसीबीच्या जाळ्यात


पुणे : जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना घोडेगाव (Ghoedegaon) येथील मंडळ अधिकार्‍याला खाजगी पंटरासह पकडण्यात आले. योगेश रतन पाडळे (38) असे या मंडल अधिकार्‍याचे नाव आहे तर लक्ष्मण सखाराम गायकवाड (61) असे खाजगी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका 36 वर्षांच्या नागरिकाने तक्रार दिली होती.

लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ
तक्रारदार यांच्या मामाच्या मुलाने जमीन (Land) खरेदी केली होती. त्या जमिनीचा फेरफार मंजर करण्यासाठी मंडळ अधिकारी योगेश पाडळे (Yogesh Padale) याने 10 हजार रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) घोडेगाव तहसील कार्यालयासमोर सापळा (Acb Trap) लावला. तहसील कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये मंगळवारी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश पाडळे याला पकडण्यात आल्या. लक्ष्मण गायकवाड (Laxman Gayakwad) याने लाचेची मागणीस सहाय्य केले, म्हणून दोघांवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा (Ghodegaon Police Station) दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा (Acb Trap) यशस्वी झाला. पोलिस निरीक्षक अलका सरग अधिक तपास करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !