कोरोना सुसाट : भुसावळात एकाच दिवसात आढळले 135 तर जळगाव जिल्ह्यात 285 रुग्ण


जळगाव : जिल्ह्यात कोरोना (Corona) सुसाट पसरत असतानाही प्रशासनाकडून धडक मोहिम राबवली जात नसल्याने रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मास्क न लावणार्‍यांसह गर्दीचे नियम पायदळी तुडवणार्‍यांवर कारवाई करण्याची अपेक्षा आहे. जळगाव जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसात तब्बल 285 रुग्ण (Corona) आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण (Corona) वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. प्रशासनाने नव्यानेच दिलेल्या अपडेट अहवालानुसार एकाच दिवसात भुसावळात आढळलेल्या बाधीतांची संख्या तब्बल 135 असल्याने चिंता वाढली आहे.

जळगावातील पुरूष रुग्णाचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 580 रुग्णांचा कोरोनामुळे (Corona)  मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 43 हजार 892 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 280 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून बुधवारी 19 रुग्णांनी कोरोनावर (Corona) मात केली तर जळगाव शहरातील 42 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला.

या शहरात आढळले नव्याने (Corona) बाधीत
जळगाव शहर 50
जळगाव ग्रामीण 17
भुसावळ 135
अमळनेर 05
चोपडा 22
पाचोरा 03
भडगाव 00
धरणगाव 02
यावल 01
एरंडोल 00
जामनेर 03
रावेर 00
पारोळा 05
चाळीसगाव 29
मुक्ताईनगर 12
बोदवड 00
अन्य जिल्हा 01




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !