कोथरूडमधील गुन्ह्यात माजी मंत्री गिरीश महाजनांना तूर्त दिलासा
कोथरूडमधील गुन्ह्यात माजी मंत्री गिरीश महाजनांना तूर्त दिलासा
मुंबई : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळावा म्हणून ट्रस्टीनां धमकावल्या प्रकरणी माजी मंत्री भाजप नेते गिरीष महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांच्याविरोधात कोथरूड येथे गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या फौजदारी गुन्ह्यात 24 जानेवारीपर्यंत महाजन यांच्यासह अन्य दोघांविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश पुणे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) दिले आहेत.


बुधवारी याचिकेवर झाली सुनावणी
कोथरूड पोलीस ठाण्यात गिरीष महाजन (BJP Leader Girish Mahajan) आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्या विरोधात धमकाविल्याचा गुन्हा दाखल असून उभयंतांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जानेवारी 2018 मध्ये घडलेल्या कथित घटनेवर डिसेंबरमध्ये 2020 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तीन वर्षापूर्वी घडलेल्या कथित घटनेवर ही फिर्याद केल्याने ती रद्द करण्यासाठी हे पुरेसे कारण असल्याचा दावा महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांच्यावतीनं हायकोर्टात (Mumbai Highcourt) करण्यात आला. बुधवारी न्यायमूर्ती प्रसन्ना वारळे आणि न्यायमूर्ती अनिल किल्लोर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली.
