धुळ्यातील पांझरा नदीच्या काठापासून दूर रहावे


जिल्हाधिकारी गंगाथरण डी.यांचे नागरीकांना आवाहन

धुळे : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदी पात्रात 58 हजार 500 क्यूसेस पाणी सोडण्यात येत असून पांझरा नदीला पूर आला आहे. अशा परिस्थितीत नागक्षहकांनी नदी काठापासून दूर राहावे. तसेच नाला काठ, जलाशयाजवळ जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी केले आहे.

नागरीकांनी सुरक्षित जागी थांबावे
जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी म्हटले आहे वह पांझरा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे तसेच मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील लहान- मोठे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नागक्षहकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. विशेषत: लहान मुलांची काळजी घ्यावी. लहान मुले पाण्याजवळ किंवा जलाशयांजवळ जाणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी. पुरापासून संरक्षणासाठी जिल्हा प्रशासन नागक्षहकांची पूर्णपणे काळजी घेत असून पांझरा नदीच्या काठावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच आवश्यक तेथून नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांनीही जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा धुळे महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरण डी., जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी केले आहे.


कॉपी करू नका.