पोलिस दलात खळबळ : 82 अधिकार्‍यांसह 231 कर्मचार्‍यांना कोरोना


मुंबई : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र धडपडणार्‍या पोलिसांनाच कोरोनाची (Corona) लागण होत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांत 82 पोलीस अधिकारी आणि 231 कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह (Corona Positive) आहेत. मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 2 हजार 497 वर पोहोचली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोरोनाशी आघाडीवर राहण्यासाठी पोलीस लढत आहेत.

राज्यात झपाट्याने होतेय वाढ





गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पोलिसांच्या (Maharashtra Police Department) कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. या तीन दिवसांत अनुक्रमे 298, 370 आणि 403 पोलिसांच्या कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. तर कोरोनाची (Corona Positive) सौम्य लक्षणे असलेल्या 9 हजार 518 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

46 हजार अधिकार्‍यांची कोरोनावर माता
राज्य पोलिस दलात (Maharashtra Police Department) गेल्या सात दिवसांत 439 अधिकारी आणि 1665 कर्मचार्‍यांसह 2104 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनाच्या (Corona) तीन लाटेमध्ये आतापर्यंत 48,971 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 6 हजार 278 पोलीस अधिकारी आणि 42 हजार 693 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 45 हजार 970 पोलिसांनी कोरोनावर (Corona) मात केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !