बंद घरातून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास : चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव : तालुक्यातील मुंदखेडा येथील शेतकर्याच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोकड मिळून तीन लाख 87 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीमुळे उडाली खळबळ
चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील रामदास धना पाटील (82) या शेतकर्याला कपाशी विक्रीतून तीन लाख 9 हजार सातशे रुपयांचे उत्पन्न मिळाले. शनिवार, 14 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता रामदास धना पाटील हे परीवारासह तांदुळवाडी, ता.भडगाव येथे गेले. ते 15 जानेवारी रोजी सायंकाळी वाजेच्या सुमारास घरी परतले असता घराचा पाठीमागील दरवाजा अर्धा उघडा दिसून आला. त्यानंतर रामदास पाटील यांनी घरातील गोदरेज कपाट पाहिले असता चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोकड तीन लाख 49 हजार आदी मिळून तीन लाख 87 हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याचे दिसून आले. रामदास पाटील यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




