महिलेच्या घरातून चोरट्यांनी 30 हजारांची रोकड लांबवली


एरंडोल : तालुक्यातील विखरण येथे एका घरातून 30 हजार 400 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसात गुन्हा दाखल
संजूबाई वना सुर्यवंशी (56, रा.विखरण, ता.एरंडोल) या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 17 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात कुणीही नसतांना घरातून 30 हजार 400 रुपयांची रोकड लांबविली. आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक रवी पाटील करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !