72 हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवली : यावलमधील घटना


यावल  दुचाकीला लावलेली 72 हजारांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी यावल पोललस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांनी लांबवली पर्स
मनीषा विजय खंबायत (30, रा.किनगाव, ता.यावल, हल्ली मुक्काम उपनगर, नाशिक) या बुधवार, 19 जानेवारी रोजी सायंकाळी नंदोई भाऊ दिनेश दिगंबर लिंबायत यांच्यासोबत दुचाकीने किनगाव येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला लावलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. यात सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याच्या रींगा आणि रोकड मिळून 72 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. या प्रकरणी मनीषा खंबायत यांनी यावल पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अजीज हमीद शेख करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !